पिंपरी की सासवड निर्णय १४ जुलैला: पुणे : ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणावर १४ जुलैला शिक्कामोर्तब होणार आहे. या दिवशी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक होणार असून, त्यात संमेलनाच्या ठिकाणाची घोषणा केली जाणार आहे.
महामंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये संमेलनासाठी स्थळ निवड समितीची स्थापना करण्यात आली. संमेलनासाठी प्रस्ताव आलेल्या पिंपरी-चिंचवड व सासवड शाखांना भेट देऊन ही समिती महामंडळाला माहिती देईल. त्यानंतर १४ जुलैच्या बैठकीत ठिकाणाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. स्थळ निवड समितीमध्ये महामंडळाचे चार पदाधिकारी, तसेच डॉ. उज्जवला मेहेंदळे (मुंबई), डॉ. दादा गोरे (औरंगाबाद) आणि प्राचार्य नामदेव कांबळे (नागपूर) यांचा समावेश असेल, अशी माहिती महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन व हैदराबाद येथील विद्या देवधर उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment