Sunday, 26 May 2013

मनसे औटघटकेचा पक्ष : अजित पवार

मनसे औटघटकेचा पक्ष : अजित पवार: पिंपरी : विरोधकांनी आरोप करण्याशिवाय दुसरे काही केले नाही. शिवाजीमहाराजांचे नाव घेणार्‍यांनी सत्ता असताना कोठे शिवसृष्टी साकारली नाही, कोणत्या किल्ल्याची डागडुजी केली नाही. शिवसेना-भाजप जातीयवादी आहे, तर तरुणांना भडकावणारा मनसे हा औटघटकेचा पक्ष आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या वेळी महापौर मोहिनी लांडे, उपमहापौर शरद मिसाळ, आयुक्त श्रीकर परदेशी, आमदार लक्ष्मण जगताप, महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे आझम पानसरे, स्थायी समिती सभापती नवनाथ जगताप, पक्षनेत्या मंगला कदम, शहराध्यक्ष योगेश बहल, नगरसेवक अजित गव्हाणे, नितीन लांडगे, विश्‍वनाथ लांडे, महेश लांडगे, नितीन काळजे, विनया तापकीर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment