दळवीनगरमधील १४ हातगाड्यांवर कारवाई: चिंचवड : अतिक्रमणविरोधी सुरू असलेली महापालिकेची कारवाई आजही झाली. ब प्रभाग कार्यालयाने पिंपरी व चिंचवडमधील दळवीनगर भागातील १४ हातगाड्यांवर कारवाई केली.
गुरुवारी दुपारी पिंपरीमधील जयहिंद कॉलेजजवळ पादचारी मार्गावर उभ्या असणार्या ६ हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न हटविल्याने ही कारवाई झाली. या वेळी या व्यावसायिकांची धांदल उडाली. अचानक झालेल्या कारवाईमुळे विक्रेते धास्तावले. अनेकांच्या मालाचे नुकसान झाले.
No comments:
Post a Comment