कार्यालय नवे; समस्या जुन्याच: पिंपरी : प्राधिकरणाच्या नूतन इमारतीत स्वतंत्रपणे अप्पर तहसील कार्यालय सुरू झाले आहे. पर्यावरणपूरक (ग्रीन बिल्डिंग) अलिशान इमारतीत कार्यालय थाटण्यात आले असले तरी सध्या त्या ठिकाणी सुविधांची कमतरता आहे.
- पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पुणे खडक येथील कार्यालयात विविध कामांसाठी चकरा माराव्या लागत असे.
- गर्दीत वाहन घेऊन जाणे किंवा बसने हेलपाटे खात कार्यालयात जावे लागत होते. हा त्रास सहन करावा लागत होता. हा त्रास कमी करण्यासाठी स्वतंत्र तहसील कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
- आकुर्डी येथे हे कार्यालय आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागणर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्याच प्रकारची सुविधा नाही. अगदी आडमार्गावर हे कार्यालय आहे.
No comments:
Post a Comment