Wednesday, 25 December 2013

बेकायदा 3788 बांधकामांना नोटीसा, 530 बेकायदा बांधकामे पाडली

महापालिका कार्यक्षेत्रात असणा-या 4161 बेकायदा बांधकामांपैकी 3788 बांधकामांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. तर 530 बेकायदा बांधकामे पाडण्यात आली आहेत. त्यात मार्च 2012 नंतरची 478 आणि मार्च 2012 पूर्वीची 52 बेकायदा बांधकामे महापालिकेने आजपर्यंत जमीनदोस्त केली आहेत.

महापालिका क्षेत्रात आतापर्यत 4161 बेकायदा बांधकामांचा स्थापत्य विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे. त्यात मार्च 2012 नंतर 2903 बांधकामांचा पंचनामा झाला असून 2899 बांधकामांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. त्यातील 2119 अनधिकृत बांधकामे करणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले असून 478 बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. तर मार्च 2012 पूर्वीच्या बांधकामांमध्ये 1258 बांधकामे आढळून आली असून त्यापैकी फक्त 889 बांधकामांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. त्यापैकी 52 बेकायदा बांधकांमे महापालिकेने पाडली आहेत.

No comments:

Post a Comment