पुणे : खिळखिळ्या पीएमपीला टेक्नोसॅवी करीत फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर आणण्यास प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. प्रवाशांना पीएमपीबद्दल असलेल्या तक्रारी आणि सूचना करण्याची संधी मिळणार असून, याचा फायदा प्रशासनाला सेवा सुधारण्यामध्ये होणार आहे. https://www.facebook.com/pmpml.org
प्रवाशांच्या सोयीसाठी, सेवेचा दर्जा वाढविण्यासाठी २0११ मध्ये पहिल्यांदा फेसबुक पेज तयार करण्यात आले होते. काही महिने या पेजवर माहिती अपलोड करण्यात येत नव्हती. त्यामुळे त्या वेळी प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नव्हता.
परंतु, आता नव्याने फेसबुक पेज तयार करण्यात आले असल्याने महामंडळाचा सेवा प्रवाशांपर्यंत पोहोचणार आहेत. पीएमपी प्रशासनातर्फे राबविण्यात येणार्या योजना आणि होणारी नवी खरेदी फेसबुक पेजच्या माध्यमातून प्रवाशांपर्यंत पोहोचेल. तसेच प्रवाशांनी दिलेल्या तक्रारी आणि सूचनांची दखल घेऊन घेत
सुधारणा करण्यास प्रयत्न केला जाणार आहे. याकरिता तांत्रिक सपोर्ट म्हणून अमोल देशपांडे आणि सुधीर बोराडे यांनी सहकार्य केले आहे. शहरातील सर्व नागरिकांनी सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीचे अध्यक्ष आर. एन. जोशी यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment