Thursday, 23 January 2014

पिंपरी येथे गुरूवारी आरपीआयचे आंदोलन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व विदर्भ रहिवासी महासंघ पिंपरी -चिंचवड यांच्या वतीने पिंपरी येथे गुरूवारी (दि. 23)  विविध मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती आरपीआयचे पिंपरी- चिंचवड शहराध्यक्ष रमेश चिमुरकर यांनी दिली.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा याठिकाणी सकाळी अकरा वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये नामदेव ढसाळ यांचे स्मारक त्यांच्या गावी उभारावे.  सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या गुंठेवारी बांधकामास परवानगी द्यावी आणि महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली होऊ नये या मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment