पिंपरी : आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी थकित मिळकतकर वसुलीसाठी बँड बाजा वाजविणे उपक्रमांचा बँड सत्ताधार्यांनी सर्वसाधारण सभेत वाजविला. मोठय़ा करबुडव्यांना सोडून सामान्य माणसाला त्रास दिला गेला. हा उपक्रम चुकीच्या पद्धतीने राबविला गेला, अशी टीका केली. त्यानंतर निवासी क्षेत्रातील सर्वसामान्यांच्या घरी बँड वाजविणे बंद करावे, असा आदेश महापौर मोहिनी लांडे यांनी प्रशासनास दिला. आयुक्त परदेशींची बदली होताच उपक्रमाचा बँड सत्ताधार्यांनी वाजविला.
No comments:
Post a Comment