Wednesday, 12 February 2014

‘परदेशींच्या बदलीमुळे मानवी हक्कांची पायमल्ली’

पिंपरी : महापालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची कालावधी पूर्ण होण्याअगोदर कोणतेही कारण नसताना बदली केल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे, अशी तक्रार ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोट्रेक्शन या संस्थेने केली आहे.
संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, निवेदनाचा विचार न करता राजकीय दबावाला बळी पडून एका प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकार्‍याचा कालावधी पूर्ण होण्याअगोदर बदली करण्यात आली. समाजोपयोगी, स्वच्छ आणि पारदर्शक कारभारामुळे भ्रष्टाचारावर नियंत्रण आले होते. चांगल्या अधिकार्‍यांना पाठिंबा न देता मूठभर राजकारणी लोकांच्या दबावाला बळी पडून शासन काय साध्य करीत आहे? (प्रतिनिधी)

No comments:

Post a Comment