एकीकडे मावळमधील दुर्गम डोंगररांगांमध्ये वसलेल्या वाड्या वस्त्या आणि दुसरीकडे विकासाचे वेगवेगळे टप्पे गाठलेली सुधारित शहरे अशा दोन्ही गोष्टींची सांगड घालून पर्यटनातून मावळचा विकास करण्याचे शिवधनुष्य मी पेलणार, असा विश्वास मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना-भाजप-रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार आप्पा उर्फ श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. पर्यटन विकासाबरोबरच स्थानिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यावर आपला भर राहिल, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment