Wednesday, 9 April 2014

'ईएमव्ही' सील करण्याचे काम दोन दिवस ...

पिंपरी विधानसभा मतदार संघातील मतदानासाठी केंद्रांवर पाठविण्यात येणा-या मतदान यंत्रांवर मतपत्रिका मोहोरबंद ( सील ) करण्याचे काम येत्या ९ व १० एप्रिलला करण्यात येणार असल्याची माहिती मावळचे निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शिंदे यांनी दिली.
मतदान केंद्रावर नियुक्त करणेत आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना दिनांक १० व ११ एप्रिल २०१४ रोजी आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर येथे सकाळी १० ते १ व दुपारी १ ते ४ अशा दोन सत्रांमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने व कामगार कल्याण अधिकारी चंद्रकांत इंदलकर हे देणार आहेत.

No comments:

Post a Comment