पिंपरी - पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह विविध शासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली खरी; पण ही बैठक म्हणजे निव्वळ देखावाच होता, असा सणसणीत आरोप ‘फ्री अप हिंजवडी’च्या समन्वयकांनी केला. पालकमंत्री म्हणून हिंजवडीतील प्रश्न सोडविण्याबाबत आपण किती गंभीर आहोत, हे दाखविण्याचाच या बैठकीतून प्रयत्न झाला. गेल्या आठ-दहा वर्षांत अशा बऱ्याच बैठका झाल्या. अनेक नेते, मंत्री, अधिकाऱ्यांनी दौरे केले. समस्या मात्र ‘जैसे थे’ राहिल्या. बापट यांनी घेतलेली ही बैठकही निष्फळ ठरण्याची खात्रीच सर्वांना अधिक वाटत आहे.
No comments:
Post a Comment