Wednesday, 29 November 2017

पिंपरी न्यायालयात संविधान दिन साजरा

पिंपरी, (प्रतिनिधी) – मोरवाडी येथील न्यायालयात पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट्‌स बार असोसिएशनच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍड.श्रीकांत दळवी, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुहास पडवळ व पिंपरी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मे.धुमकेकर उपस्थित होते. यावेळी न्यायाधीश धुमकेकर यांनी घटनेचे महत्त्व समजावून सांगितले. ऍड. श्रीकांत दळवी घटनेतील कलम 19(1) अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य या विषयावर विचार व्यक्‍त करताना म्हणाले की, आपण आपले स्वातंत्र्य उपभोगताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

No comments:

Post a Comment