पुणे - तुम्ही २४ किंवा त्यापेक्षा अधिक उंचीच्या इमारतीत राहाता? त्याचा ताबा अजूनही बांधकाम व्यावसायिकाकडेच असल्यास इमारतीत ‘रेफ्युज एरिया’ आहे का? याची नक्की खात्री करा. कारण, तुमच्या सुरक्षिततेसाठी इमारतीमध्ये हा ‘एरिया’ असायलाच हवा. तो बंधनकारक आहे. पण, तुम्हाला गाफील ठेवून संबंधित बांधकाम व्यावसायिक तो विकण्याची शक्यता आहे. हा ‘एरिया’ विकणे सोडाच पण, त्याचा अन्य कारणांसाठीही वापर नियमबाह्य असेल. हा प्रकार म्हणजे, तुमच्या जिवाशी खेळच असेल! अशा गंभीर बाबींची दखल घेऊन महापालिकेच्या अग्निशामक दलाने ३६ जणांना नोटिसा बजाविल्या आहेत. त्यातील तिघा जणांवर कठोर कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
No comments:
Post a Comment