पिंपरी – शहरात विकास कामे करण्यासाठी महापालिकेत सल्लागारांचा सुळसुळाट झाला आहे. मागील स्थायी समितीत पेव्हींग ब्लॉकच्या कामासाठी सल्लागार नेमण्यात आला. त्यानंतर आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पिंपळे सौदागर आणि पिंपळे निलखमधील रस्त्यांच्या कामासाठी सल्लागार नेमण्यात आला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपने गेल्या आठ महिन्यात केवळ सल्लागार नियुक्तीचा कार्यक्रम हाती घेवून पध्दतशीरपणे करदात्या नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी सुरु केली आहे.
No comments:
Post a Comment