पिंपरी, प्रतिनिधी – चिंचवड येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे डॉ.अरविंद ब. तेलंग इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथे आंतरराष्ट्रीय ब्रेड दिन साजरा करण्यात आला.
मंगळवारी दि. 31 रोजी सिम्बोयसिस स्कूल ऑफ कलिनरी आर्ट बेकरी विभागप्रमुख पंकज देशपांडे यांच्या उपस्थित साजरा करण्यात आला. बीएससीएचएसच्या द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील बेकरीचे शेफ प्रा. रोहन वाडकर यांच्या मदतीने वेगवेगळ्या देशातील विविध प्रकारचे ब्रेड बनविले होते. त्यामध्ये जर्मनी, इटली, फ्रांस आणि अमेरिका अशा देशांचा समावेश करण्यात आला होता.
No comments:
Post a Comment