पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिका दापोडी येथील “सीएमई’ प्रवेश द्वारासमोर भुयारी मार्ग बांधकामाची स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे आणि नगरसेविक आशा धायगुडे-शेंडगे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहाणी केली व काही महत्त्वपूर्ण बदल करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तेथूनच दापोडी गावात जाण्यासाठी रस्ता असल्याने सीएमई प्रवेश द्वारासमोर प्रचंड वाहतूक असते. पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. भुयारी मार्ग उभारण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून त्यासाठी येणाऱ्या खर्चाला स्थायी समितीत मंजुरीही देण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, उप अभियंता डी. डी. पाटील, कनिष्ठ अभियंता बी. एम. शेटे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment