पिंपरी- जागतिक अपंग दिनानिमित्त दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरास दिव्यांगांसाठी केलेल्या आदर्श व्यवस्थेसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. उज्जैनचे जिल्हाधिकारी व मंदिर व्यवस्थापन समिती अध्यक्ष संकेत भोंडवे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. संकेत भोंडवे यांना यापूर्वीही ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या विशेष कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले होते. भोंडवे हे पिंपरी-चिंचवडचे रहिवासी आहेत. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे शहराच्या राष्ट्रीय लौकीकात भर पडली आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले जगद्विख्यात भगवान महाकालेश्वर मंदिर हे दर्शन-पूजाविधींकारिता दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष व्यवस्था करणारे देशातील पहिले मंदिर ठरले आहे. मंदिर व्यवस्थापनाने दृष्टिहीन दिव्यांगांसाठी उपलब्ध केलेले ब्रेल संकेताक आणि स्मार्ट फोन सदृश विशिष्ठ असे उपकरण भाविकांसाठी मंदिरामध्ये दिशादर्शकाचे काम करीत आहे. दिव्यांगांसाठी विशेष निवास योजनेसहित व्हीलचेअर, हेडफोन यांसारख्या अद्ययावत सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

No comments:
Post a Comment