Thursday, 21 December 2017

अवेळी मिळणाऱ्या वीज बिलाने ग्राहक त्रस्त

  • विकासनगर किवळे : बील भरणा सवलतीपासून ग्राहक वंचित
  • गृह रचना संस्थांमध्ये बिले वाटपात कामचुकारपणा उघड
  • सर्व बिले ठेवतात एकाच पत्र पेटीत
देहुरोड, (वार्ताहर) – विकासनगर-किवळे परिसरात महा-वितरणकडून अवेळी मिळणाऱ्या वीज बिलाने ग्राहक त्रस्त झाले आहेत. महा-वितरणने तातडीने दखल घेऊन संबंधितांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक करीत आहे.
महा-वितरणाकडून दरमहा वीज ग्राहकांना वीज बिले घरपोच देण्यासाठी सर्वत्र ठेकेदारामार्फत व्यवस्था करण्यात येते. संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून विकासनगर-किवळे परिसरातील विविध भागात वीज बिले उशिरा मिळत असल्याची ग्राहक तक्रार करीत आहेत. येथील काही ग्राहकांना महा-वितरणाचे नोव्हेंबर महिन्याचे देयक (बील) 16 डिसेंबरला मिळाले आहे. वास्तविक या बिलाची तारीख 7 डिसेंबर 2017 असून हे बील ग्राहकांना मुदतीत मिळणे अपेक्षित असताना हे बिले मिळण्यास नऊ दिवसाचा अवधी लागला असल्याने ग्राहकांनी महा-वितरणच्या संबंधित ठेकेदाराच्या कारभाराबाबत खेद व्यक्‍त केला आहे.

No comments:

Post a Comment