Thursday, 21 December 2017

कागदपत्रे न दिल्याने फेरनिविदांची नामुष्की

  • स्थापत्य विभाग ः निविदेबाबत ठेकेदारांना मुदतवाढ देणे बंद
  •  376 कामांचे दिले आदेश
पिंपरी, (प्रतिनिधी)- महापालिकेच्या स्थापत्य विभागातील रस्ते डांबरीकरण यासह विविध कामांच्या निविदा ऑनलाईन भरण्यात येतात. त्या निविदा भरल्यानंतर 72 तासांच्या आत संबंधित ठेकेदारांने निविदेची कागदपत्रे स्थापत्य विभागाकडे आणून देणे बंधनकारक आहे. परंतू, त्याकडे ठेकेदार दुर्लक्ष करतात, त्या ठेकेदारांना अपात्र ठरवून पाचपेक्षा तीन निविदा असतील तरच निविदा उघडण्यात येते, अन्यथा सदरील निविदा प्रक्रिया रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत 177 फेरनिविदा काढण्याची नामुष्की स्थापत्य विभागावर आली आहे.

No comments:

Post a Comment