Wednesday, 17 January 2018

पवना नदीनंतर आता इंद्रायणीही होणार जलपर्णीमुक्त

रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन, रानजाई प्रतिष्ठान व आळंदी नगरपरिषद यांचा संयुक्त उपक्रम
निर्भीडसत्ता न्यूज –
शहरातील नदी स्वच्छतेचा वसा रोटरी कल्बच्या सदस्यांनी घेतला आहे. पवनामाईच्या स्वच्छता अभियानाप्रमाणे रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन यांनीही इंद्रायणी जलपर्णीमुक्त करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यानुसार सोमवारी (दि.15) आळंदी येथे सायंकाळी पाचच्या सुमारास इंद्रायणी घाटावर नदीची आरती करुन इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. 

No comments:

Post a Comment