पिंपरी - देशाची ध्येयधोरणे ठरविताना विद्यार्थ्यांची भूमिका सरकारपर्यंत पोचावी, या उद्देशाने मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अभिनव उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांनी देशाचे धोरण निश्चित करणारा प्रश्न विचारायचा आहे. उत्कृष्ट प्रश्न विचारणाऱ्यास संसदेचे कामकाज पाहण्याची संधी मिळणार आहे. येत्या वीस फेब्रुवारीपर्यंत मावळ मतदारसंघातील विद्यार्थ्यांनी प्रश्न पाठविण्याचे आवाहन खासदार बारणे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment