पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावर महापालिकेने दापोडी ते निगडीदरम्यान आठ-नऊ वर्षांपूर्वी बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) मार्ग उभारला. अद्याप तो कार्यान्वित केलेला नसून गेल्या सहा महिन्यांपासून सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर काम सुरू आहे. सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून स्थायी समितीच्या अध्यक्षांनी या बीआरटी मार्गाला विरोध केला असून महापालिका आयुक्त व आयआयटी पवईच्या तज्ज्ञ पथकाने या मार्गाची पाहणी केली आहे. त्यामुळे दापोडी-निगडी मार्गावर बीआरटी बससेवा केव्हा सुरू होणार याची उत्सुकता लागली आहे.

No comments:
Post a Comment