पिंपरी : वैद्यकीय क्षेत्रातील निर्माण होणारा जैविक कचरा नष्ट करण्याचे नियम कायद्याने घालून दिलेले आहेत. महापालिका त्यासाठी लाखो रुपये दरवर्षी खर्च करते. जैविक कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेची गाडी असते. मात्र, अनेक दवाखाने, रुग्णालय व मेडिकलवाले याकडे दुर्लक्ष करतात. अशा पद्धतीने रस्त्यावर जैव कचरा फेकणारा डॉक्टर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कचाट्यात सापडला असून, त्याला पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. डॉ. अभिजित कांबळे असे दंड केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

No comments:
Post a Comment