पिंपरी : पिंपरी-चिंचवड कष्टकरी कामगारांची नगरी आहे. गेल्या दहा वर्षात या नगरीला विकासनगरी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राष्ट्रवादीने शहरातील करदात्यांना "किमान कर, कमाल सुविधा' अशी करप्रणाली ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. परंतु, आता महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पाणीपट्टीत दुपटीने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकार म्हणजे करदात्यांच्या खिशात हात घालून स्वतः:च्या घशात मलाई टाकण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा, आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला.
No comments:
Post a Comment