पिंपरी - पवना जलविद्युत केंद्रातील तांत्रिक दुरुस्तीचे काम शुक्रवारपर्यंत सुरू राहणार असल्यामुळे त्याचा परिणाम धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणावर झाला आहे. जलसंपदा विभागातर्फे पुरेसे पाणी सोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तरीदेखील शहरात गेले दोन दिवस विस्कळित झालेला पाणीपुरवठा आणखी दोन दिवस काही भागांत विस्कळित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन महापालिकेने बुधवारी केले.

No comments:
Post a Comment