आकुर्डीतील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘केपीआयटी स्पार्कल – 2018′ स्पर्धेची सांगता
चौफेर न्यूज – ऊर्जा आणि वाहतुकीच्या साधनांची सर्वच स्तरांवर मागणी वाढली आहे. एकीकडे ही वाढ होत असताना पर्यावरणाचा -हास होत असून तो रोखण्यासाठी जागतिक पातळीवर मोठ्याप्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. त्यातुनच अपारंपारिक ऊर्जा तसेच पर्यावरणपुरक वाहनांची निर्मिती करण्याकडे कंपन्यांचा कल वाढला आहे. भारतात ही सौर-पवन ऊर्जा, बॅटरी-वीजेवर चालणारी वाहने यावर संशोधन होत आहे. भारतीयांमध्ये संशोधनवृत्ती जोपासण्याचे काम होत असून अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून ‘स्पार्कल’ सारख्या स्पर्धा विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पना, विचारांना खतपाणी घालण्याचे कार्य करीत आहेत. ही बाब स्वागतार्ह आहे, असे मत ज्येष्ठ संशोधक पद्म विभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment