पिंपरी-चिंचवड शहराचे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत गेल्या महिन्यात पाहणी करण्यात आली आहे. त्याचा निकाल मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिलमध्ये अपेक्षित आहे. पहिल्या वर्षी देशात नवव्या स्थानी असलेल्या शहराचे स्थान गेल्या वर्षी 72 व्या स्थानी फेकले गेले होते. यंदा हा क्रमांक सुधारतो की, शहर आणखी मागे पडते, याकडे महापालिका पदाधिकारी, प्रशासनासह नागरिकांचे लक्ष लागले आहे. यंदा समाधानकारक स्थान मिळेल, अशी अधिकार्यांची अपेक्षा आहे.
No comments:
Post a Comment