पिंपरी - सामान्य मुलींप्रमाणे वाढणारी खेळकर, हसरी, खोडकर सायली गजभीव सहा वर्षांची असताना अचानक खेळताना दारात चक्कर येऊन पडली आणि मग चक्कर येण्याचे सत्र सुरूच झाले. डॉक्टरांना आधी फिट येत असेल असे वाटले. पण, निदानाअंती समजले की तिला ‘प्रायमरी पल्मोनरी हायपरटेंशन’ हा गंभीर आजार झालाय. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. सायलीचा त्रास वाढत गेला. आता तिच्यावर हृदय आणि फुफ्फुस बदलण्याची शस्त्रक्रिया करायची आहे.
No comments:
Post a Comment