पिंपरी – पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीसह लगतच्या ग्रामीण पट्ट्यात सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुविधा पुरविण्यासाठी कार्यरत असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) व्यवस्थापनाच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. 2014 पासून ते 2016 पर्यंत सातत्याने उत्पन्नात होत असलेल्या वाढीस 2016-17 या आर्थिक वर्षात मात्र ब्रेक लागला आहे. या आर्थिक वर्षात पीएमपीएमएलला मोठी घट सोसावी लागली आहे. 2015-16 साली पीएमपीला वेगवेगळ्या स्त्रोतांमार्फत 776.75 कोटी उत्पन्न मिळाले होते. 2016-17 या आर्थिक वर्षात मात्र त्यात 56 कोटी 18 लाखांची घसरण होऊन हे उत्पन्न 720.93 कोटींवर येऊन थांबले आहे.
No comments:
Post a Comment