पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते दापोडी या अंतरातील वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न जटिल बनत चालला आहे. महापालिका हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावर पार्किंगसाठी वाहनतळाची अपुरी सुविधा आहे. पर्यायाने, रस्त्यावरच वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने वाहने लावली जातात. काही वाहने तर चक्क पदपथावर लावली जातात. त्यामुळे पादचाऱ्यांचीदेखील गैरसोय होते. निगडी ते दापोडी या अंतरातील पार्किंग समस्येबाबत ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. त्याचा हा सविस्तर वृत्तांत.
No comments:
Post a Comment