चिऊ ताई, चिऊताई दार उघड’, ‘एक घास चिऊचा..’ अशा चिऊताईच्या अनेक गोष्टी ऐकत आपण लहानाचे मोठे झालो. जणू ती आपल्या घरातील एक सदस्यच होती. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाच्या सुरक्षा साखळीत महत्वाचा घटक असलेल्या या चिमणीची संख्या कमी झाली आहे. भ्रमणध्वनीच्या मनोरर्यांमुळे ही संख्या कमी झाले असल्याचे काहींचे म्हणणे असले, तरी याला अद्याप शास्त्रीय आधार मिळालेला नाही. सिमेंटची जंगले, वृक्षतोड यामुळे चिमण्यांच्या अधिवासावर गदा आली असून, त्यांची संख्या या कारणांमुळे नक्कीच कमी झाली आहे. चिमणीची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा, आहे त्या चिमण्या व त्यांचा अधिवास कायम आबाधित ठेवल्यास त्यांची संख्या नक्की वाढेल आणि त्यांचे चिवचिवणे पुन्हा एकायला मिळेल, असे मत निसर्गअभ्यासकांनी जागतिक चिमणी दिवसानिमित्त व्यक्त केले.
No comments:
Post a Comment