पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने पाच वर्षात 55 नगरसेवकांना स्थायी समितीत संधी देण्याचे निश्चित केले आहे. चिठ्ठीद्वारे स्थायीतून भाजपचे सहा नगरसेवक बाहेर पडले होते. तर, चिठ्ठीतून बचावलेल्या स्थायी समितीच्या भाजपच्या चार आणि एका अपक्ष नगरसेवकांचा राजीनामा महापौर नितीन काळजे यांनी शुक्रवारी(दि.9) मंजूर केला आहे. त्यामध्ये भाजपचे लक्ष्मण उंडे, प्रा. उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी आणि निर्मला कुटे, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे यांचा समावेश आहे. दरम्यान, नव्या सदस्यांची आगामी सर्वसाधारण सभेत निवड केली जाणार आहे. त्यामुळे स्थायीत जाण्यासाठी भाजप नगरसेवकांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे.
No comments:
Post a Comment