चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाला (पीसीसीओई) एसीएम विद्यार्थी अध्यायाने भारतातील सर्वोत्तम विद्यार्थी अध्यायाचा व्दितीय पुरस्कार पटकावला. एसीएमचे जागतिक अध्यक्ष डॉ. विकी हॅन्सन आणि एसीएम इंडियाचे अध्यक्ष डॉ. माधवन मुकुंद यांच्या हस्ते पर्सिस्टंट सिस्टिम, नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात पुरस्कार वितरण करण्यात आले. पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने डॉ. सोनाली पाटील, प्रा. राहुल पितळे, विद्यार्थी प्रतिनिधी अब्दुल वासे, अंकुश पाठक, शिवानी जुनावणे, विशाल मौर्य यांनी हा पुरस्कार स्विकारला.
No comments:
Post a Comment