पिंपरी - परिवहन विभागाच्या नियमावलीनुसार आयुर्मान संपलेली ६९ वाहने महापालिकेने भंगारात काढली आहेत. त्यांच्या लिलावासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविली होती. प्राप्त निविदांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. परिवहन विभागाच्या नियमावलीनुसार वाहनांचे वायुर्मान १५ वर्षे निश्चित केले आहे. त्यानंतर वाहनांच्या वापरावर बंदी आहे. त्यामुळे महापालिकेने आयुर्मान संपलेली व अपघात अथवा अन्य कारणांनी वापरात नसलेली ६९ वाहने भंगारात काढली आहेत.

No comments:
Post a Comment