जुनी सांगवी - मुळा, पवना नद्यांच्या संगमावर वसलेल्या सांगवीकरांना जलपर्णी व डासांच्या त्रासाचा सामना दरवर्षी करावा लागतो. गेली अनेक वर्षापासुन जलपर्णी हे सांगवीकरांच कायमचं दुखणं झालं आहे. या हंगामात तर साचलेली जलपर्णी व त्यामुळे वाढलेल्या डासांचा उपद्रव सांगवीकरांना नको नकोसा झाला होता. महापालिकेकडुन या विषयांकडे झालेले दुर्लक्ष तोकडी यंत्रणा, ठेकेदाराने कामास लावलेली दिरंगाई, बोपोडी पुलाच्या कामासाठी टाकलेला भराव व त्यामुळे प्रवाह थांबलेले पाणी आणी त्यावर जोमाने फोफावलेली जलपर्णी यामुळे उकाड्याबरोबरच सांगवीकरांना डासांमुळे घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. नदी किनारा भागातील रहिवाशांना डासांच्या उपद्रवाबरोबरच जलपर्णीमुळे दुर्गंधीयुक्त वासाचा सामना करावा लागत होता. पिंपरी चिंचवड शहरातील काही स्वयंसेवी सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने पवना नदीतील दशक्रिया विधी घाट ते सांगवी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलापर्यंतची जलपर्णी दोनदा काढण्यात आली.

No comments:
Post a Comment