मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी पुणे महापालिकेतील भाजप नगरसेवकांना अगदी निक्षून सांगितले होते की, ‘नगरसेवकांनी आणि त्यांच्या नातेवाइकांनी ठेकेदारी करू नये’. तोच नियम पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपलाही तंतोतंत लागू आहे. मात्र, बहुतांशी नगरसेवक आणि त्यांच्या तमाम मित्र परिवार, नातेवाइकांना इथल्या ठेक्यातच खरा इंटरेस्ट आहे. निवडणुकीत केलेला कोटी-दोन कोटी खर्च त्याशिवाय निघणार कसा, असा बिनतोड युक्तिवाद काही लोकप्रतिनिधींचा आहे.

No comments:
Post a Comment