पुणे - देशातील मेट्रो प्रकल्पांचा विस्तार वेगाने होत असतानाच आता त्यासाठी कुशल मनुष्यबळाची कमतरता भेडसावू लागली आहे. त्यावर शिक्षणाच्या माहेरघरातून मार्ग शोधण्यात यश आले आहे. अभियांत्रिकीबरोबरच विज्ञान शाखेच्या पदवीधरांनाही आता ‘मेट्रो’ प्रकल्पांत करिअर करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठीचा खास अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षात येथे सुरू होत आहे. त्यामुळे देशातील मेट्रो प्रकल्पांना तंत्रज्ञांची रसद पुण्यातून मिळणार आहे.
No comments:
Post a Comment