पुणे - रिंगरोड विकसित करताना आपत्कालीन परिस्थितीमध्ये या रस्त्यावर विमान उतरविता येईल, अशी सुविधा तीन ठिकाणी या रस्त्यावर करण्यात येणार असल्याचे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सांगण्यात आले. त्याबरोबरच भविष्यातील गरज लक्षात घेऊन रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंटदेखील उभारण्यात येणार आहे. या सुविधा असलेला राज्यातील हा पहिला रिंगरोड असणार आहे.

No comments:
Post a Comment