पिंपरी – इंद्रायणी नदीच्या प्रदुषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोणतीही प्रभावी उपाय-योजना केली नसल्याने नागरिकांनी या प्रदुषणाच्या तक्रारी थेट पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे केल्या आहेत. याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. याबाबत लवकरच संबंधित सर्व विभागांची मुंबईत मंत्रालयात बैठक आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

No comments:
Post a Comment