वाईन शॉप, बिअर शॉप आणि बिअर बार विक्रेत्यांना यापुढे दारूच्या ब्रँडची जाहिरातबाजी करण्यास शासनाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी लावलेले जाहिरात फलक तातडीने काढून घ्यावेत, अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू विक्रेत्यांना दिला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक दारू विक्रेत्यांनी उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होण्याच्या भीतीने दुकानासमोरील जाहिरातीचे फलक हटवले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

No comments:
Post a Comment