महापालिका ते दापोडीपर्यंत 7.6 किमीचे काम सुरू
185 सेगमेंट ट्रॅकवर बसविले, तर 788 सेगमेंट तयार
पिंपरी-चिंचवड : शहरात मेट्रोचे काम वेगात सुरु आहे. दापोडीपासून ते पिंपरी-चिंचवड महापालिकेपर्यंत 7.619 किलोमीटर अंतराचे हे काम सुरु असून मागील दीड वर्षात मेट्रोने कार्यपूर्तीचा 40 टक्क्यांचा टप्पा गाठला आहे. सेगमेंट खांबांवर बसविणे ही सर्वात वेळखाऊ प्रक्रिया आहे. सध्या 185 सेगमेंट ट्रॅकवर बसवले असून 788 सेगमेंट तयार आहेत. यामध्ये 2.263 किलोमीटर अंतरापर्यंत सेगमेंट टाकता येणार आहेत. आणखी 1576 सेगमेंट मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड मधील कामासाठी लागणार असून सेगमेंट निर्मितीचे मेट्रोने 40 टक्के काम पूर्ण केले आहे.
No comments:
Post a Comment