पिंपरी : महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस 15 वर्षे सत्तेत होती. मात्र, त्या काळात त्यांना आंद्रा व भामा-आसखेड धरणातून पाणी आणता आले नाही. तसेच, पवना बंद जलवाहिनी योजना पूर्ण करता आली नाही. त्यामुळे शहरात काही तांत्रिक कारणाने कमी दाबाने पाणी पुरवठा होत असताना राष्ट्रवादीने पाण्याचे राजकारण करु नये, असा टोला पक्षनेते एकनाथ पवार यांनी विरोधकांना लगावला आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा अधिकार्यांना कोंडले तसेच सत्ताधारी व प्रशासनावर आरोप केले. त्याला उत्तर देताना पवार बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रवादीने पाण्यावरून राजकारण करू नये. शहरासाठी अधिकचे पाणी घेण्यासाठी भाजप प्रयत्न करीत आहेत. त्या दृष्टीने यशस्वी पाठपुरावा सुरू आहे. पुढील आठवड्यात आंद्रा व भामा-आसखेड धरणातील पाणी साठ्याला परवानगी देण्याबाबत बैठक आहे. त्यात त्यावर अंतिम निर्णय होणार आहे.
No comments:
Post a Comment