पिंपरी-चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्हिजन इंडीया’ या प्रकल्पांतर्गत ‘व्हिजन महाराष्ट्र-पुणे’ या प्रदर्शनाचे आयोजन चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे करण्यात आले आहे. शनिवार ते रविवारपर्यंत असणारे हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत आहे. आयुश मंत्रालयाचे आयुर्वेदिक स्टॉल आणि खादी ग्रामोद्योग विभागाचे आकर्षक हस्तकला, हातमाग, खादी उत्पादने यांचे स्टॉल, अन्न औषध विभाग तसेच इंडियन कौन्सिल फॉर मेडीकल रिसर्च (आयसीएमआर), इस्त्रो – अंतराळ संशोधन व तंत्रज्ञान विभाग, संरक्षण आणि संशोधन विभाग, डीआरडीओ, खादी व ग्रामोद्योग विभाग, दिव्यांग विभाग, एनआरडीसी (राष्ट्रीय संसाधन संरक्षण परिषद), जागो ग्राहक जागो, सेल (स्टील थॉरिटी ऑफ इंडिया), एनआयएफ (नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन), आयोग्य व आहार, स्किल डेव्हलपमेंट विभागांचे मार्गदर्शन करणारे स्टॉल असतील. प्रदर्शनास विद्यार्थी, युवक, लघुउद्योजक, उद्योजक, कामगार, शेतकरी, ग्रामीण भागातील विविध सहकारी संस्थांनी भेट द्यावी, असे आवाहन समन्वयक मनी वशिष्ठ यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment