शहर विद्रुप करणार्यांवर होणार गुन्हा दाखल
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मिळकती अथवा सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे पोस्टर्स, बॅनर्स अथवा भित्तीपत्रके लावून शहर विद्रुप करणार्यांकडून प्रती चौरस मीटर 650 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच आरोग्य निरीक्षकांकडून संबंधितावर गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे. याबाबतच्या धोरणाला महासभेने मान्यता दिली. शहरातील ठिकठिकाणच्या पालिकेच्या मिळकती, रस्त्याच्या कडेला, पुलाचे कठडे, भिंती, विद्युत फिडर आदी ठिकाणी विनापरवाना भिंतीपत्रके, हॅण्डबिल, पोस्टर्स, स्टीकर्स लावले जातात. तसेच, जाहिरातीसाठी रंगकाम केले जाते. त्यामुळे शहर विद्रुप होत आहे. या संदर्भात कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचा सूचना स्थायी समितीने दीड महिन्यांपूर्वीच प्रशासनाला दिल्या होत्या. अखेर त्यासंदर्भात नुकतीच प्रशासनाने कार्यवाही सुरू केली. कारवाईचे अधिकार क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य निरीक्षकास दिले आहेत.
No comments:
Post a Comment