पिंपळे सौदागर – गणेशोत्सव काही दिवसांवर आला असताना अद्याप गणेश विसर्जन घाटाची साफसफाई करण्यात आली नव्हती. नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी सदर बाबीची दखल घेत तातडीने पालिका आरोग्य विभागास संपर्क साधून देवी आई माता व दत्त मंदिर घाट, नदी पात्र परिसर तसेच बाकी सर्व घाटांची साफ-सफाई करण्याची सूचना संबंधित विभागाला दिल्या. त्यानंतर देवी आई माता व दत्त मंदिर घाट व नदीपात्र परिसर साफ सफाईच्या कामास पालिका आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे.
No comments:
Post a Comment