शहरातील गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचनांची दखल घेतलेली असून त्याबाबत निश्चितपणे कार्यवाही करण्यात येईल. विसर्जन मार्गावरील खड्डे हे बुजवण्यात येतील. तसेच, अधिकृत विज जोड घ्यावी, जेणेकरून कोणतीही दुर्घटना होणार नाही. पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी महापालिकेने केलेल्या जाहीर आवाहनाप्रमाणे गणेश मंडळानी कार्यवाही करावी. मिरवणुकीतील पारंपारिक ढोल लेझीमचा वापर करून ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी लोखंडी ढोलचा वापर कमी करण्याबाबत मंडळानी विचार करावा, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.

No comments:
Post a Comment