पिंपरी-चिंचवड : बसच्या इंजिनमधील जॉईंट तुटल्याने बीआरटी बस बीआरटी मार्गात बंद पडली. ही घटना गुरुवारी दुपारी पाचच्या सुमारास एच ए कॉलनी स्टॉपवर घडली. बीआरटी बस बंद पडल्याची एका आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. हडपसरवरून निगडी भक्ती-शक्तीकडे जाणारी बीआरटी बस (एम एच 14 / सी डब्ल्यू 1869) पिंपरीमधील एच ए कॉलनी बस स्टॉपवर आली असता, इंजिनमधील तांत्रिक दोषामुळे (जॉईंट तुटला) बंद पडली. दरम्यान बसमधून सुमारे 40 प्रवासी प्रवास करत होते. चालक व वाहक दोघांनी मिळून प्रवाशांना अन्य बसमध्ये बसवून प्रवाशांच्या गंतव्यस्थळी पोहोचविण्याची व्यवस्था केली.
No comments:
Post a Comment