Saturday, 1 September 2018

लँड माफिया घुसले ‘ग्रीन झोन’मध्ये !

पिंपरी-चिंचवड : शहराच्या ठिकाणी स्वत:च एक घर असावं, हे प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं. जागा घेऊन घर बांधणे हे तर त्यापेक्षा स्वप्न! याच मानसिकतेचा फायदा उठवत लॅण्ड माफियांनी चक्क पिंपरी-चिंचवडमधील ग्रीन झोनचा बाजार मांडला आहे. पॉश राहणी, चकचकीत कार्यालय आणि कमिशनवर नेमलेल्या बोलबच्चन एजंटांचा ताफा एवढ्याच भांडवालवार राजकीय व्यक्तींच्या वरदहस्ताने दररोज लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे. स्वप्न पुर्ण करण्यासाठी आयुष्यभराची पुंजी सामान्य माणूस प्लॉटसाठी देतो. मात्र, प्लॉट नावावर होत नसल्याचे अगदी अखेरच्या क्षणी समजल्यानंतर तो संपूर्ण उध्वस्त होतो. याविरोधात काही आवाज उठवावा इतपर्यंतही त्याच्या अंगात त्राण उरत नाही. आणि एखाद्या अंगात असलाच जोर तर त्याला राजकीय दबावातून त्याची मुस्कटदाबी केली जाते…हा सारा प्रकार तळवडे, चिखली, पंतनगर या भागात सुरू आहे. आता या लॅण्डमाफियाची नजर चिखलीमधील शेतजमिनीवर गेली आहे. चिखली येथील गट नं. 754/755 मधील शेतजमीन ग्राहकांची दिशाभूल करून विकण्यास सुरूवात केली आहे.

No comments:

Post a Comment