पिंपरी: पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सर्व्हिसेस अँड ऍग्रीकल्चर औद्योगिक संघटना गेल्या कित्येक दिवसांपासून निर्णयाच्या प्रतिक्षेत असलेले आठ प्रलंबीत मुद्दे प्रामुख्याने या बैठकीत उपस्थित करील. या आठ मुद्द्यांत सर्वांत प्रमुख मुद्दा स्वतंत्र औद्योगीक वसाहत दर्जाचा आहे.राज्यातील एमआयडीसी क्षेत्रास स्वतंत्र औद्योगीक वसाहती’ चा दर्जा देणारा अध्यादेश प्रलंबीत आहे. लवकरात लवकर यावर निर्णय घेण्यात यावा आणि उद्योगांना स्वातंत्र्य मिळावे, अशी मागणी उद्योजकांची आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा माथाडीचा आहे. माथाडी कायद्यातील फॅक्टरीज हा शब्द वगळण्यात यावा. या एका शब्दाने माथाडी नेत्यांनी संपूर्ण उद्योग जगतास वेठीस धरले आहे.पिंपरी-चिंचवडमध्ये ऍटो आणि इंजीनियरिंग दोन्ही क्लस्टर आहेत. परंतु शहराच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये प्लॅस्टिक आणि रबर उद्योगांचाही मोठा वाटा आहे. यासाठी स्वतंत्र क्लस्टर स्थापन करण्याची मागणी आहे.
No comments:
Post a Comment